आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नगरपंचायत

नेवासा | प्रतिनिधी नानासाहेब पवार – नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभारातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम असताना ९३ मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण झाल्याचा दावा केला. मात्र, तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयाने अशी एकही कारवाई झालेली नसल्याचे स्पष्ट केल्याने माहिती अधिकारातून समोर आलेल्या शासकीय नोंदींमुळे नगरपंचायतीच्या दाव्यावर व कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नगरपंचायत

नगरपंचायतीने दि. २ जुलै २०२६ रोजी दिलेल्या अधिकृत पत्रात छत्रपती संभाजीनगर येथील मे. कल्पक बहुउद्देशीय संस्था या ठेकेदारामार्फत ९३ मोकाट कुत्रे पकडून तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच या कामाचा अहवाल दि. १५ मे २०२६ रोजी नगरपंचायतीला प्राप्त झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

नगरपंचायत

मात्र, तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयाने दि. २४ जुलै २०२६ रोजी माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात दि. १० ऑगस्ट २०२५ ते १३ जुलै २०२६ या कालावधीत नेवासा नगरपंचायतीसाठी एकाही मोकाट कुत्र्याचे निर्बीजीकरण अथवा लसीकरण करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित कालावधीतील नोंद ‘शून्य’ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हा संपूर्ण विरोधाभास सामाजिक कार्यकर्ते शिवा राजगिरे यांनी माहिती अधिकारातून मिळविलेल्या शासकीय कागदपत्रांमुळे समोर आला आहे.

नगरपंचायत

एका बाजूला नगरपंचायत ९३ कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्याचा दावा करते, तर दुसरीकडे संबंधित शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाकडे त्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे नगरपंचायतीचा दावा नेमका कोणत्या आधारावर करण्यात आला, ठेकेदाराचा अहवाल कशाच्या आधारे स्वीकारण्यात आला, संबंधित कामाचे बिल अदा झाले आहे का? झाले असल्यास ते कोणत्या कागदपत्रांच्या आधारे? तसेच या प्रकरणात कोणती आर्थिक अनियमितता झाली आहे का, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत

नगरपंचायत

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार या प्रकरणातील दोन्ही शासकीय पत्रांच्या प्रतींसह शिवा राजगिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने दिलेली आश्वासने हवेत विरल्याचा आरोप करत, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

कुत्र्यांचे निर्बीजीकरण; मग कुणालाच कसे कळले नाही? नगरपंचायतीने ९३ मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्याचा दावा केला आहे. मात्र ही मोहीम नेमकी कधी राबविण्यात आली, कुत्रे शहरातील कोणत्या भागातून पकडण्यात आले आणि त्यांना कुठे सोडण्यात आले, याची माहिती नागरिक, नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींनाही नाही. त्यामुळे ही कारवाई प्रत्यक्षात झाली की केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात आली, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नगरपंचायत
नगरपंचायत
नगरपंचायत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नगरपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!