आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गोरक्षनाथ

सोनई – चैतन्य गोरक्षनाथ मंदिराच्या कलश रोहन सोहळ्यानिमित्त भव्य दिंडी व त्रिदिनीय सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला नाथभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून विविध गावांतून दिंडीचे स्वागत करण्यात येत आहे.

गोरक्षनाथ गडाहून दिंडीचे प्रस्थान झाले. सोनई येथे दिंडीचे आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. माजी सभापती सुनील गडाख यांनी जेसीबीवरून पुष्पवृष्टी करून स्वागत केले. सोनई परिसरातील नाथभक्त व ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. जगदंबा देवी मंदिर येथे ग्रामस्थांच्यावतीने दुपारच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

गोरक्षनाथ

या स्वागत सोहळ्यात गणेश गडाख, नामदेव येळवंडे, सुनील भाऊ गडाख मित्रमंडळ, शंकरराव गडाख मित्रमंडळ तसेच सुजाता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी लेझीम, झांज व ढोल पथकाद्वारे सहभाग नोंदवला. चैतन्य गोरक्षनाथ महाराजांची मूर्ती बैलगाडीतून मिरवण्यात आली. गोरक्षनाथ महाराज की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की जय या जयघोषांनी सोनई परिसर दुमदुमून गेला.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोरक्षनाथ
गोरक्षनाथ
गोरक्षनाथ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोरक्षनाथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!