
नेवासा – कृषी मालाची निर्यात ठप्प झाल्यामुळे सुमारे चार ते पाच हजार कोटी रुपयांच्या मालाचा प्रश्न निर्माण होत आहे कृषी क्षेत्रावरील मोठे संकट निर्माण झाले असून तोटा होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनुभवी निर्यातदार अभ्यासू शेतकरी कृषी मालाचे व्यापारी कृषी तज्ञ कृषी प्रक्रिया उद्योगातील उद्योजक यांना आपत्कालीन उपाय सुचविण्यासंदर्भात डॉक्टर अशोकराव ढगे यांनी विनंती केली आहे.

भाजीपाला व प्रक्रिया तंत्रज्ञान याचाही उपयोग झाला पाहिजे त्यामुळे तातडीने केळी चे वेफर्स चिप्स तसेच द्राक्षाचे मनुके बेदाने व टोमॅटोचे सॉस इत्यादी पदार्थ तयार करणे साठी कृषी मंत्रालयाने प्रक्रिया उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे.

तसेच दुसरा पर्याय म्हणजे स्थानिक बाजारपेठांचा अभ्यास करून देशभरातील मोठ्या बाजार पेठा कडे फळे भाजीपाला पाठवावेत स्थानिक मार्केट व मागणी तसेच पुरवठा याची साखळी निर्माण करावी यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर सरकारने उपाययोजना आपत्कालीन व्यवस्थापन व कार्यवाही यासंदर्भात समिती नेमून शेतीवरील संकट कसे सोडवता येईल याचा तातडीने मार्ग काढावा अशी विनंती कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

