मक्तापूर (प्रतिनिधी): दि. २४ मार्च २०२६
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवारी अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने मक्तापूर गावातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर आनंदाने न्हाऊन निघाला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी श्री संजय जी लखवाल (BDO) साहेब, केंद्रप्रमुख श्री रवींद्र कडूपाटील साहेब, युवा उद्योजक सिद्धांत दादा नवले,मक्तापूरचे सरपंच अनिल लहारे पाटील आणि मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री गणेश भाऊ झगरे,श्री.ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.भाऊसाहेब पाटील कांगुणे,शिंदे शिवसेना गटाचे श्री.मनोज झगरे,श्री.रमेश साळवे,सतीश बर्डे,तंटामुक्ति अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे,अमोल सातपुते,भानुदास शिरसाठ,सचिन गायकवाड,अजित झगरे,गणेश शिंदे मेजर,प्रदीप साळवे तसेच बरीच अशी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा रंगतदार कलाविष्कार:
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी ‘गणेश वंदना’ सादर केली. त्यानंतर विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी कोळीगीत, लावणी, देशभक्तीपर गीते आणि सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका सादर केल्या. चिमुकल्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.

मान्यवरांचे मार्गदर्शन:
यावेळी बोलताना
गटविकास अधिकारी श्री संजयजी लखवाल साहेब यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले सिद्धांत दादा नवले यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले,मराठा सुकाणू समितीचे प्रदेशध्यक्ष श्री गणेश भाऊ झगरे यांनी शाळेतील मुलांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.सरपंच अनिल लाहरे पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.
या सोहळ्यासाठी मक्तापूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्री रेवननाथ पवार, श्री सुभाष चव्हाण सर, श्री राजू आडे सर यांनी केले.शाळेच्या शिक्षिका मॅडम आणि शिक्षक सहकारी श्री रवी महागावे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली, उपस्थित सर्वांचे आभार शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मानण्यात आले. शेवटी राष्ट्रगीताने या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







