आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अशोक खरात

क्राइम स्टोरी – नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318(4) तसेच महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत कलम 3(2) व 3(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राजेंद्र नानासाहेब भागवत (वय 39, व्यवसाय – कापड व्यापारी, रा. गाडेनगर, नेवासा फाटा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अशोक एकनाथ खरात याने स्वतःला “कृष्णाचा अवतार” असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला.

अशोक खरात

डिसेंबर 2022 ते 19 मार्च 2026 या कालावधीत नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील ओकर्स लॅण्ड डेव्हलपर्स येथे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्यवसायातील अडचणी दूर करून प्रगती घडवून आणण्याचे आमिष दाखवत आरोपीने फिर्यादीकडील सुमारे 20 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या घेतल्या.

या अंगठ्यांमध्ये “पुष्कराज व हिरा मंत्रबद्ध करून बसवून देतो” असे सांगत आरोपीने बनावट धातूच्या अंगठ्या परत दिल्या. तसेच, दैवी शक्ती प्राप्त होईल असे सांगून तब्बल ₹2,62,000/- रोख रक्कम उकळल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

अशोक खरात

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, नागरिकांनी अशा अंधश्रद्धा व जादूटोण्याच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशोक खरात
अशोक खरात

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अशोक खरात
अशोक खरात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अशोक खरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!