आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
एसटी

नेवासा-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसला थांबा मिळणार असल्याचे पत्र अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक यांच्याकडून प्राप्त झाले आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ खंडाळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

देवगड फाटा

नेवासा तालुक्यातील देवगड हे मोठे तीर्थक्षेत्र असल्याने
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, येथे लांब पल्ल्याच्या बसेसला थांबा नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती. ही समस्या ओळखून रामभाऊ खंडाळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही मागणी पाठपुरावा करून लावून धरली होती. अखेर ना. विखे यांच्या आदेशानुसार विभाग नियंत्रक यांनी सर्व बसेस देवगडफाटा येथे थांबतील, असे पत्र दिल्याने दूरवरून येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.

विभाग नियंत्रक यांनी रामभाऊ खंडाळे यांना दिलेल्या पत्रात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव या विभागातील धावणाऱ्या सर्व बसेस देवगड फाटा येथे थांबतील. याबाबत संबंधीत आगार व्यवस्थापकांना ही कळविले असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.

देवगड फाटा

महंत भास्करगिरी महाराज यांनी समाधान व्यक्त करत खंडाळे व त्यांना पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य करणारे साहेबराव महाराज चावरे व सेवेकरी खंडू शिंदे यांचा श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला.

newasa news online
देवगड फाटा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

देवगड फाटा
देवगड फाटा
देवगड फाटा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

देवगड फाटा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!