नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानमध्ये गुढीपाडव्यापासून अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांच्या पुढाकाराने तसेच वेदाचार्य देविदास महाराज मस्के यांच्या संकल्पनेतून नित्य महाअभिषेक व महाआरती सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तर काल दि. ३१ मार्च २०२६ रोजी, भगवान महावीर जयंती निमित्त नेवाशातील ज्येष्ठ विधीतज्ञ विजय चंगडिया यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माऊली भक्तांनी उपस्थिती दर्शवली होती. महाआरतीनंतर उपस्थितांना प्रसाद म्हणून पेढ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने विजय चंगडिया यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान संस्थानचे मठाधिपती वेदाचार्य देविदास महाराज मस्के यांनी भगवान महावीर यांच्या ‘जगा आणि जगू द्या’ या संदेशाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या प्रेम आणि सहअस्तित्वाच्या विचारांशी या संदेशातील साम्य अधोरेखित केले. पुढे त्यांनी रोज होणाऱ्या नित्य महाआरती व महाअभिषेकला उपस्थित राहण्यासाठी नेवासकरांना यावेळी त्यांनी आव्हान केले आहे.

या प्रसंगी डॉ. गणेश गरोटे, कृष्ण महाराज हरडे, शिवाजी होऊन, रवी जमदाडे, विष्णू जाधव, गोरख भरात यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध भजनी मंडळांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






