आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
स्नेहसंमेलन

पाचेगाव फाटा (वार्ताहर) नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने दि ६ एप्रिल वार सोमवार रोजी शाळेच्या आवारात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यात मराठी,हिंदी,लावण्या,देशभक्ती गीतावर नृत्य करीत लहान मुलांचे व शाळेच्या शिक्षकांचे कौतुक यावेळी ग्रामस्थांनी केले.या कार्यक्रमाचे उद्घाटन आजी ,माजी सरपंच,आजी माजी,उपसरपंच,चेअरमन, व्हा चेअरमन,सर्व सदस्य, संचालक,पालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेलपिंपळगाव केंद्राचे प्रमुख विनायक कदम हे होते.

स्नेहसंमेलन


लहान मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन हा शालेय जीवनातील एक अत्यंत आनंददायी, उत्साहवर्धक आणि अविस्मरणीय उत्सव आहे, जो सहसा प्रत्येक शाळेत साजरा केला जातो. या कार्यक्रमातून मुलांच्या नृत्या, नाटके, गाणी आणि विविध कलागुणांना व्यासपीठ मिळते,ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते.
लहान मुले नृत्य, समूहगीत, नाट्य आणि नकला सादर करून आपल्या पालकांना समोर आनंदात नाचताना दिसले.
यामध्ये मुले फेटा, धोतर किंवा नऊवारी साड्यांमध्ये पारंपारिक वेशभूषेत दिसणाऱ्या मुलांचे खरे आकर्षण ठरले.

स्नेहसंमेलन

शाळेतील शिक्षकांनी स्नेहसंमेलनापूर्वी अनेक दिवस तालमी घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अटीतटीचे प्रयन्त केले.
उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या मुलांना भरघोस प्रतिसाद देत बक्षीस देऊन प्रोत्साहित केले गेले,त्यात शाळेला बक्षीसच्या स्वरूपात मोठी देणगी या रुपात जमा झाली.
हा सोहळा शिक्षक, पालक आणि मुलांमधील नाते अधिक घट्ट करतो,थोडक्यात स्नेहसंमेलन हे केवळ मनोरंजनाचा भाग नसून ते मुलांच्या सर्वांगीण विकासाचे एक मोठे माध्यम आहे.हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वृंद,शालेय व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्नेहसंमेलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!