आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
महापारेषण

नेवासा – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हॉट लाईन युनिटचा भत्ता ३३.३३ टक्क्यांवरून वाढवून ४० टक्के करण्यात आला आहे. प्रशासकीय परिपत्रक क्र. ७०३ नुसार कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ताही लागू करण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
महापारेषणचे हॉट लाईन युनिट वीज पुरवठा सुरू असतानाच दुरुस्ती व देखभाल करते. त्यामुळे वीज खंडित करण्याची गरज राहत नाही. लोडशेडिंग टाळता येते. राज्यभर अशा युनिट्सचे मोठे जाळे आहे. नव्या निर्णयामुळे नियमित देखभालीवर अधिक भर दिला जाणार आहे.

महापारेषण


या परिपत्रकावर सुरुवातीला काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालिका सुचिता भिकाने आणि मुख्य महाव्यवस्थापक राजू गायकवाड यांनी संघटनांशी चर्चा केली. शंकांचे निरसन झाले. त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, संचालक सतीश चव्हाण आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल. उत्पादकता सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महापारेषण

भविष्यातील तांत्रिक बिघाड टळणार
नवीन नियमावलीमुळे ४००, २२० आणि १३२ केव्ही उपकेंद्रांतील उपकरणांची तपासणी वीज सुरू असतानाच करता येणार आहे. त्यामुळे बिघाड आधीच ओळखता येतील. ते टाळता येतील. औद्योगिक, व्यापारी व कृषी क्षेत्राचा वीज पुरवठा खंडित होणार नाही. सिस्टीमची कार्यक्षमता वाढेल.

newasa news online
महापारेषण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महापारेषण
महापारेषण
महापारेषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महापारेषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!