
आज मंगळवार (दि. 21) रोजी नेवासा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी चार्ज घेतला. नेवासाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्ष, अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे.

सागर ढिकले हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात सक्रिय अधिकारी आहेत. सागर ढिकले हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्यांचा छडा लावण्यात माहीर आहेत.

शनी शिंगणापूर मंदिर देणगी घोटाळ्याचाही तपास त्यांच्याकडे होता.ढिकले हे सायबर सेल येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. सायबर सेलमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. नेवासा तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







