नेवासा : नेवासा नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांवर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आल्यानंतर सूडभावनेतून ऍड. संजय सुखधान यांच्यावर गोळीबार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत नेवासा शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज, सोमवार दि. २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता नेवासा पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येणार आहे.

या आंदोलनादरम्यान प्रशासनास निवेदन देण्यात येणार असून, संबंधितांवर निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
दरम्यान, या निषेधाला पाठिंबा दर्शवत स्वतःहून नेवासा शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन सर्वपक्षीय नेवासकरांच्या वतीने करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







