नेवासा –नेवासा नगरपंचायत हद्दीतील शासकीय जमिनींवरील १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नगरपंचायत सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाचा दाखला देत या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. या योजनेत केवळ १ जानेवारी २०११ पूर्वीची आणि सध्या अस्तित्वात असलेली ‘निवासी’ अतिक्रमणेच नियमित केली जातील.५०० चौ. फुटांपर्यंत पूर्णपणे मोफत नियमितीकरण.५०० ते १५०० चौ. फूट प्रचलित बाजारमूल्याच्या १०% शुल्क.व्यावसायिक वापर संबंधित क्षेत्रासाठी २५% शुल्क आकारले जाईल.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२६ आहे.


भूमी अभिलेख विभागामार्फत अतिक्रमित जागेची मोजणी विनामूल्य केली जाणार आहे. नियमित केलेली जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ स्वरूपात दिली जाईल आणि पुढील ५ वर्षे ती हस्तांतरित करता येणार नाही.नदी, नाले, जंगल, सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या जागा किंवा धोकादायक क्षेत्रांवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत. अपात्र अतिक्रमणांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही यावेळी देण्यात आला.

पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत स्तरावर अर्जांची छाननी करून प्रस्ताव समितीकडे पाठवण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. “नेवासा येथील ही प्रक्रिया राज्यासाठी पथदर्शी ठरेल अशा पद्धतीने काम करावे,” असे निर्देश पाटील यांनी दिले.

या बैठकीस तहसीलदार, अपर तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

‘युद्धपातळीवर काम करणार’ – नगराध्यक्ष
नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी या जनहितैषी निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानले. तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गरिबांच्या घरांचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







