आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कांदा

नेवासा-नेवासा बाजार समिती येथे बुधवार, दि. ६ मे रोजी सकाळी 9 वाजता खुल्या कांदा खरेदी-विक्रीचा शुभारंभ होणार असून, या उपक्रमामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) व महंत वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते व बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

कांदा

नेवासा बाजार समितीत आठवड्यातील प्रत्येक मंगळवार व गुरुवार या दिवशी खुल्या कांदा लिलावाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी नेवासा येथे आणावा, असे आवाहन सभापती नंदकुमार पाटील यांनी केले आहे.

घोडेगाव येथील कांदा गोणी मार्केटला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथेही खुल्या कांदा खरेदी-विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कांद्याची काढणी सुरू असताना योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी जागेवरच माल विक्री करत आहेत. मात्र, अशा शेतकऱ्यांनी खुल्या लिलावासाठी नेवासा बाजार समितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन
करण्यात आले आहे.

कांदा

नेवासा, भालगाव, गोधेगाव, प्रवरासंगम, सलाबतपूर, जळके, वरखेड, रामडोह, गोगलगाव, गळनिंब, मुरमे, सुरेगाव गंगा, सुरेगाव दही, देडगाव, पाचेगाव, पुनतगाव, खुपटी, बेलपिंपळगाव, बेलपांढरी तसेच नेवासा बु. परिसरासह नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नेवासा येथे खुल्या कांदा विक्रीस सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरगावी जाऊन विक्री करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. तसेच, कांदा विक्रीनंतर शेतकऱ्यांना तत्काळ काटा-पट्टी पेमेंट मिळणार असल्याने आर्थिक व्यवहार सुलभहोणार आहेत.

कांदा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कांदा
कांदा
कांदा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कांदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!