आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मयूर वाखुरे

नेवासा : शिवसेना (शिंदे गट)च्या तालुका आढावा बैठकीच्या निमित्ताने आज नेवासा विधानसभा क्षेत्रात संघटनात्मक फेरबदल करण्यात आले.यामध्ये स्व. अॅड. कारभारी व वाखुरे यांच्या सामाजिक राजकीय कार्याची दखल घेत, त्यांचे सुपुत्र अॅड. मयूर वाखुरे यांची नेवासा विधानसभा कायदे विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलराव औताडे यांनी ही नियुक्ती जाहीर करत अॅड. वाखुरे यांच्यावर कायदेशीर बाबी आणि संघटनेची बाजू भक्कम करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीनंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते अॅड. मयूर वाखुरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मयूर वाखुरे

यावेळी व्यासपीठावर खा. ज्योतीताई वाघमारे, आ. विठ्ठलराव लंघे पाटील, प्रभाकर काका शिंदे, भाऊसाहेब वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार लंघे साहेब आणि खा. ज्योतीताई वाघमारे यांनी वाखुरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून, या निवडीमुळे नेवासा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची कायदेशीर फळी अधिक मजबूत होणार आहे.

मयूर वाखुरे

चौकट-स्व. अॅड. कारभारी वाखुरे यांची पक्षप्रती असलेली एकनिष्ठता, तालुक्यात कायदेविषयक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य केले होते. तोच वारसा पुढे चालवण्यासाठी अॅड. मयूर वाखुरे यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “संघटनेच्या कायदेविषयक अडचणी सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,” असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष अॅड. मयूर वाखुरे यांनी व्यक्त केला.

मयूर वाखुरे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मयूर वाखुरे
मयूर वाखुरे
मयूर वाखुरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मयूर वाखुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!