
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील सोनई जवळील हनुमानवाडी शिवारात शेतातील पिकांना पाणी देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका एकावर लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी युनुस बाबुभाई पठाण (वय ५२, रा. हनुमानवाडी, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जावेद रफिक पगाण, शायद रफिक पठाण व जरीना रफिक पठाण (सर्व रा. हनुमानवाडी, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २५ रोजी सायंकाळी ९.३०वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेतातील पिकांना पाणी देण्याच्या कारणावरून फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीत युनुस पठाण हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनई येथे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गु. र नं. १४८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रवींद्र पवार करीत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







