सोनई | संदीप दरंदले – नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या सोनई शाखेचा १५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक कडूभाऊ काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
वर्धापन दिनानिमित्त शाखेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सीईओ अनिल कदम, रिजनल ऑफिसर देविदास कदम, यशवंत मिसाळ, एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर निलेश वैद्य, शाखा अधिकारी प्रवीण काशीद, दिनेश गाडेकर, शैलेश वाघ, कानिफनाथ कोकाटे, मोनिका साळवे, गायत्री निमसे तसेच सोनई शाखेतील सर्व कर्मचारी टीम उपस्थित होती.

यावेळी प्रमुख उपस्थित पत्रकार संदिप दरंदले यांनी नागेबाबा संस्थेच्या १५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत. संस्थेचे प्रमुख कडुभाऊ काळे यांनी लोकमंगल फॉउंडेशनच्या धर्तीवर होतकरू तरुणांचे नेटवर्क उभारून स्वयंरोजगार निर्मिती साठी व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दयावे असे दरंदले यांनी सांगितले.

यावेळी सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते अंबादास राऊत यांनी बोलताना सांगितले कि नागेबाबा संस्था ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक सेवा आणि सामाजिक बांधिलकी यामुळे नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सिओ अनिल कदम यांनी वैचारिक पुस्तक देऊन केला.सोनई वर्धापन दिनानिमित्त स्थानिक खातेदार, व्यापारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.वर्धापन दिनानिमित्त शाखेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी सर्वासाठी एक पुस्तकं भेट व अल्पउपहार देण्यात आला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







