
सोनई – सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ५९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील बाबासाहेव ठोंबरे (वय ३५, रा. तारांगण बंगला, धनगर गल्ली, सोनई, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्याने घराच्या दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. घरातील वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेले. यात ५ ग्रॅम वजनाची सोन्याची ओम असलेली चेन, मंगळसूत्र सोन्याची नाकातील नथ चोरीस गेली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







