आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गहिनीनाथ

पाचेगाव फाटा (वार्ताहर)-नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील श्री गहिनीनाथ महाराजांची चार दिवसाचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला, अति उन्हाची तीव्रता असूनही यात्रेत यंदा प्रथमच गर्दीचा उच्चांक झाला. नेवासा तालुका पोलिसांनी यात्रेच्या काळात सलग तीन दिवस चोख बंदोबस्त ठेवल्याने मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा मनमुराद आंनद महिला,पुरुषांनी व ग्रामस्थांना घेतला.

गहिनीनाथ


पाचेगाव येथील गहिनीनाथ महाराज यात्रा महोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केला जातो. गंगाजल मिरवणूक, जलभिषेक, झेंडा मिरवणूक, छबीना मिरवणूक,शोभेच्या दारुची आतषबाजी, लोकनाट्य, आर्केस्ट्रा, कुस्त्यांचा जंगी हगामा अशा विविध कार्यक्रमांची चार दिवस रेलचेल होती,यंदा उन्हाची तीव्रता जास्त असतानाही माहेरवासिनी, पै पाहुणे व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने यात्रेत हजेरी लावल्याने गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला.
लोकनाट्याच्या कलाकारांनी सादर केलेल्या अदाकारीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कुस्तीच्या फडात नामवंत मल्लां सह महिला पैलवानाची उपस्थिती लक्षवेधी होती. सुमारे तीन तासांपेक्षा जादा वेळ कुस्त्यांचा फड सुरु होता.शनिवारी सायंकाळी सादर झालेल्या आर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.शेवटची कुस्ती सात हजार एक रुपये करून यात्रेची सांगता करण्यात आली.नेहमीप्रमाणे उपस्थिती आर्केस्ट्राच्या उत्तम अनेक कलाकारांनीही सादरीकरण केल्याने गितांना प्रेक्षकांकडून वन्स मोअर मिळत होता.

गहिनीनाथ


चार दिवस सुरु असलेल्या यात्रा महोत्सवासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज आहेर,विकास पाटील,पाचेगाव बीट हवालदार अशोक लिपणे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल कर्डीले सह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस चोख बंदोबस्त व टवाळखोरांवर बारीक नजर ठेवल्याने यात्रा शांततेत पार पडली. यात्रा कमेटीची गेल्या महिन्याभरापासून यात्रौत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन केले होते.
यात्रेसाठी गेल्या महिन्यापासून यात्रा कमिटीने अथक परिश्रम घेऊन यात्रौत्सव शांततेत पार पडला.यात्रा काळात संस्कृती कार्यक्रमावेळी सी सी कॅमेरे व ड्रोनमुळे यात्रौत्सव शांततेत पार पडून ग्रामस्थांनी यात्रेचा मनमुरादपणे आनंद घेतला.

गहिनीनाथ


गेल्या चार वर्षांपासून जंगी कुस्त्याचा हागमा बंद करण्यात आला होता,पण चार वर्षानंतर प्रथमच कुस्त्याच्या हंगामा भरल्याने प्रेक्षकांना सह पुरुष व महिला पैलवानाची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत लाईट लावून कुस्त्या सुरू होत्या.शेवटची कुस्ती ही तीन हजार शंभर रुपयांची होऊन श्री गहिनीनाथ महाराजाच्या जयजयकार करित यात्रेची सांगता करण्यात आली.

गहिनीनाथ
गहिनीनाथ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गहिनीनाथ
गहिनीनाथ
गहिनीनाथ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गहिनीनाथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!