नेवासा- नशेसाठी गुन्हेगारीत अडकणाऱ्या नेवाशातील बाल गुन्हेगारांना पुन्हा चांगल्या मार्गावर आणण्यासाठी बाल संरक्षण समितीची नितांत गरज आहे त्यांना शिक्षेऐवजी चांगल्या शिक्षणाची व सहानुभूतीची गरज असते प्रत्येक मुलाला आधार व योग्य मार्गदर्शनाची गरज असते तसेच बालविवाह ,बालमजुरी ,बाल लैंगिक अत्याचार इत्यादीचे प्रमाण वाढत असताना बाल संरक्षण समिती स्थापन केल्यास हे प्रमाण निश्चित कमी होईल . तसेच बालमजुरीचे प्रमाण घटवण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी समाजामध्ये सकारात्मक चळवळ सुरू होईल,असे डॉक्टर अशोक गावित्रे यांनी यावेळी सांगितले

या संदर्भातील निवेदन त्यांनी शिर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले साहेब तसेच उपनगराध्यक्ष सौ शालिनी सुखदान व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ जयश्री ताई शिंदे यांना दिली असून या समितीच्या अध्यक्ष हा त्या वार्ड चा नगरसेवक असतो व अंगणवाडी सेविका ह्या सदस्य सचिव म्हणून काम पाहतात तसेच एक अठरा वर्ष वयाची मुलगी व एकवीस वर्षाचा मुलगा देखील या समिती मध्ये असतो तसेच पोलीस अधिकारी ,डॉक्टर वकील ,सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा देखील समावेश या कमिटीमध्ये करता येतो बाल न्याय ,(बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम आणि महाराष्ट्र शासनाच्या 2015 च्या परिपत्रकानुसार प्रत्येक नागरी प्रभागात प्रभागात बाल संरक्षण समिती स्थापन करणे हे बंधनकारक आहे

ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मध्ये या समित्या स्थापन झाले असून शहरात मात्र या अजून पर्यंत स्थापन झालेल्या नाहीत तरी या समीत्या लवकरात लवकर स्थापन करून त्या कार्यरत कराव्या अशी मागणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी डॉक्टर नितीन गरकळ, नगरपालिकेचे निरंजन शहाणे व सिटी कॉर्डिनेटर योगेश सरगर हे देखील उपस्थित होते.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नेवासा नगरीमध्ये घरगुती बाल अत्याचार हे प्रमाण जवळ जवळ नाहीच परंतु बालमजुरी व शिक्षण या क्षेत्रात काम करण्याची निश्चितच गरज आहे.बाल संरक्षण समिती स्थापन करून बालकांच्या हक्कासाठी भरीवाचं काम येत्या कार्यकाळात करू असे आश्वासन सभापती सौ.जयश्रीताई शिंदे यांनी दिले. सामाजिक कार्यकर्ते संदीप सरकाळे यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







