
नेवासा –“होमिओपॅथिक उपचार पद्धती ही केवळ मानवी शरीरापुरती मर्यादित नसून, वनस्पतींची संतुलित वाढ आणि विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी ती एक प्रभावी संजीवनी ठरू शकते. भविष्यात जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी होमिओपॅथी हाच शाश्वत शेतीचा आधार असेल,” असे प्रतिपादन प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ प्रा. डॉ. प्रकाश खेडकर यांनी केले.

जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (नाशिक) ‘आयुष’ विभागातर्फे आयोजित ‘हीलिंग विथ होमिओपॅथी’ या राज्यस्तरीय चर्चासत्रात डॉ. खेडकर बोलत होते. “शाश्वत शेतीसाठी होमिओपॅथी” या विषयावर त्यांनी आपले प्रदीर्घ अनुभव आणि संशोधन यावेळी सादर केले.या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. संदीप कडू, होमिओपॅथी विभागप्रमुख डॉ. राजकुमार पाटील, मॅनेजमेंट कौन्सिल बोर्ड सदस्य डॉ. मनीष इनामदार आणि क्लीनिकल बोर्डाचे चेअरमन डॉ. आशिष भगत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आपल्या विवेचनात डॉ. खेडकर यांनी जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये होमिओपॅथीच्या प्रभावी भूमिकेवर प्रकाश टाकला. रासायनिक शेतीला सक्षम पर्याय म्हणून होमिओपॅथीकडे पाहण्याची गरज असून, आगामी काळात कृषी क्षेत्रात या पॅथीच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील विविध होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








