आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कामिका एकादशी
कामिका एकादशी

नेवासा : “आनंदाचे डोही आनंद तरंग…” असा असीम भक्तिभाव उराशी बाळगून कामिका एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र नेवासा येथे लाखो भाविकांचा जनसागर लोटला. महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या या पावन भूमीत माऊलींच्या दिव्य ‘पैस’ खांबाचे दर्शन घेताना भाविक तल्लीन झाले. पंढरपूरची वारी पूर्ण करून आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी नेवासे नगरीत प्रवेश करताच टाळ-मृदंगाच्या गजराने अन् ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला.

कामिका एकादशी

रविवारी (दि. ९ ऑगस्ट) पहाटे ३ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हभप गुरुवर्य देविदासजी महाराज म्हस्के यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात पवित्र ‘पैस’ खांबाची महापूजा संपन्न झाली. यावेळी मध्यमेश्वर देवस्थानचे बालयोगी महंत श्री ऋषिनाथजी महाराज, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, मुख्य चोपदार गणेश महाराज आरगडे, हरी महाराज भोगे, राम महाराज खरवंडीकर, भगवान महाराज डिके, मयूर महाराज डौले, डॉ. संजय सुकाळकर, विश्वस्त कृष्णाभाऊ पिसोटे, गुंफाबाई पिसोटे, माऊली भक्त कृष्णाभाऊ खरड व शांताबाई खरड आदी उपस्थित होते.

कामिका एकादशी

पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनानंतर माऊलींच्या दर्शनाने वारीची सांगता करण्यासाठी नेवासा, गंगापूर, राहुरी, श्रीरामपूर आणि शेवगाव परिसरातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी मंदिर परिसर भक्तिमय केला. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री व अध्यक्ष माजी आमदार पांडुरंगजी अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळाने दिंड्यांचे श्रीफळ व प्रसाद देऊन स्वागत केले.

कामिका एकादशी

या सोहळ्यात देवगड दत्त मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विश्वासराव गडाख, कैलासराव जाधव, मुळाचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील, किशोर गारुळे, लक्ष्मणराव जगताप, बाबासाहेब मोरे, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, महेश लोखंडे, संदीप सरकाळे, प्रवीण सरोदे, पांडुरंग निपुंगे, राजेंद्र काळे, असिफ पठाण, बाळासाहेब कोकणे, बाळासाहेब मारकळी आणि जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे आदी मान्यवरांनी दर्शन घेतले.

कामिका एकादशी

दर्शनासाठी एक किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या होत्या. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने तसेच पंचगंगा उद्योग समूहाचे उद्योजक प्रभाकरराव शिंदे, संचालक बाळासाहेब शिंदे व काकासाहेब शिंदे यांच्या वतीने साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला.

तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, उद्योजक रविराज तलवार, लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, सुवर्णकार समाज माऊली मित्र मंडळ, मगर परिवार, नागेबाबा पतसंस्था आणि नेवासा तालुका ब्राह्मण सभा यांच्या वतीने चहा, दूध, फळे व खिचडीचे वाटप करण्यात आले.

कामिका एकादशी

तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने, तर पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखली. होमगार्ड व स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन सांभाळले. जिल्हा परिषद शाळा, ज्ञानोदय हायस्कूल, नाथबाबा विद्यालय आणि बाजार समिती प्रांगणात वाहनांसाठी सुटसुटीत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या स्वयंसेवकांनी दर्शनरांगेचे नियोजन केले. रात्रीच्या वेळी ‘पैस’ खांब मंदिर आणि वैकुंठवासी हभप बन्सी महाराज तांबे समाधी मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कामिका एकादशी
कामिका एकादशी
कामिका एकादशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कामिका एकादशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!