नेवासा – नेवासा येथील दुय्यम निबंधक यांचेकडे खोटे खरेदीखत दस्त नोंदवून खरेदी खतामध्ये जमीन नावे असलेली महिला आपणच असल्याचे भासवून जमीनीची विक्री केल्याची घटना घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संजय रावसाहेब पटारे ऊर्फ पठाडे (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडे खरेदी खत दस्त नं. ५९१०/२०२४ चे खोटे खेरदी दस्त नोंदवून सदर खरेदी खतामध्ये कांताबाई विनायक पटारे उर्फ पठाडे हिने मीच चंद्रभागा विनायक पटारे उर्फ पठाडे असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे सादर करुन मयत महिला चंद्रभागा विनायक पटारे उर्फ पठाडे यांचे नावे असलेली शेत गट नं. ८६ मधील जवळपास सव्वादोन एकर (७२ आर) या शेतजमीन मिळकतीची स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर विक्री केलेली आहे.

कांताबाई विनायक पटारे उर्फ पठाडे, बाबासाहेब विनायक पटारे उर्फ पठाडे, चंद्रभान विनायक पटारे उर्फ पठाडे तिघे रा. धामोरी ता. नेवासा, यशोदा भाऊसाहेब शेळके रा. आरडगाव ता. राहुरी, हिराबाई राम वाघ रा. नारायणवाडी ता. नेवासा व कमलबाई विश्वनाथ म्हस्के रा. जेऊर हैबती यांनी स्वतःच्या फायद्याकरिता संगनमत करुन बनावट कागदपत्रे सादर करुन माझी फसवणूक केली आहे. या फिर्यादीवरुन वरील ६ जणांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







