
नेवासा-दि.१ रोजी खडका फाटा रस्त्यावरील हॉटेल प्रवरा जवळ अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता.त्यानंतर सदर मयतास शविच्छेदनासाठी नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र ३ दिवस उलटूनही सदर मयताच्या नातेवाईकांचा शोध न लागल्याने नेवासा पोलीस कर्मचारी गणेश नागरगोजे व नेवासा नगरपंचायत कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन नेवासा येथील स्मशानभूमीत अंत्यविधी काल ५ वाजेच्या सुमारास केला आहे

\शिवमुद्रा ॲम्ब्युलंन्स तर्फे अपघात झाल्यापासून तर थेट अंत्यविधी पर्यंत मोफत सेवा देण्यात आली.अंत्यविधीला नगरपंचायत चे कर्मचारी पोलीस कर्मचारी होते. त्यांच कोणीच नाही म्हणणाऱ्या जगात आम्ही त्यांचे कोणीतरी झालो आणि अंत्यविधी केला अशी भावना यावेळी पो.कॉ. गणेश नागरगोजे यांना व्यक्त केली


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







