
नेवासा –तीर्थक्षेत्र येथे संत साहित्य अभ्यास केंद्र सुरू करण्या संदर्भात मराठी भाषेचे कॅबिनेट मंत्री नामदार उदय सामंत यांच्या समवेत आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी अभ्यास पूर्ण चर्चा. नेवासा फाटा येथील रेणुका माता सभागृहात नामदार उदय सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री यांची कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर सभा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली या प्रसंगी माजी कुलगुरू डॉ अशोक ढगे यांनी यांनी नेवासा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी संत साहित्य अभ्यास केंद्र सुरू करावे यासंदर्भात टिप्पणी सादर केली

पवित्र नेवासा तीर्थक्षेत्राच्या परिसरात संत महंत वारकरी व संत साहित्याचे अभ्यासक आहेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी जगाला मार्गदर्शक असलेली ज्ञानेश्वरी या अलौकिक ग्रंथाची रचना व पसायदान ही विश्व प्रार्थना निर्मितीचे अद्वितीय कार्य केले अशा या पवित्र भूमित संत साहित्यिक अभ्यासाचे जागतिक केंद्र व तदनंतर त्याचे रूपांतर संत विद्यापीठात करावे अशी मागणी डॉ ढगे यांनी केली यासंदर्भात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी या संदर्भात अभ्यासपूर्ण मंत्री महोदयासमवेत चर्चा घडवली व कार्यवाहीची मागणी केली


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







