आपला जिल्हा – शेवगावच्या कन्या तेजस्वी सातपुते यांच्यावर राज्यातील महत्त्वाची जबाबदारी; पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती. शेवगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद बातमी म्हणजे शेवगावच्या सुकन्या तथा कर्तबगार आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे शेवगावच्या नावाला पुन्हा एकदा राज्यभरात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू खरात प्रकरणातील विशेष तपास पथकाची (SIT) जबाबदारीही सातपुते यांच्याकडे कायम ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या धाडसी, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख कार्यशैलीवर शासनाने दाखवलेला हा विश्वास मानला जात आहे.

तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखत अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले. सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकपदाच्या कार्यकाळातही त्यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत प्रभावी कामगिरी बजावली. मुंबईतील जबाबदाऱ्यांमध्येही त्यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाची छाप सोडली होती.

त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू खरात प्रकरणाच्या एसआयटी तपास प्रमुखपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे तपास प्रक्रियेला अधिक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
तेजस्वी सातपुते यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे शेवगाव तालुक्याची मान उंचावली असून, तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाने ग्रामीण भागातील तरुणींनाही नवे प्रेरणास्थान मिळाले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








