आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वाळू

वैजापूर तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदेशीर वाळू तस्करीचा रक्तरंजित चेहरा समोर आला आहे. बाभुळगावगंगा शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या एका शेतकऱ्यावर तस्करांच्या टोळीने बेदम मारहाण करत थेट गोळीबार केल्याची थरारक घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

वाळू

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गोळीबार करणारा मुख्य आरोपी हा श्रीरामपूर नगरपरिषदेचा (Municipal) अपक्ष नगरसेवक अर्जुन खुशाल दाभाडे असल्याचे समोर आले आहे. दाभाडे हा चर्चित नीलेश शेंडगे हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी असून त्याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हाही दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फिर्यादी दिसताच विकास उर्फ विकी ढमके याने “तू आमचे लोकेशन महसूल आणि पोलिसांना सांगतोस का?” अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर तस्करांच्या टोळीने शेतकऱ्याला पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घाबरलेल्या शेतकऱ्याने तत्काळ आपल्या नातेवाईकांना फोन करून मदतीसाठी बोलावले. मात्र नातेवाईक घटनास्थळी पोहोचताच टोळीने त्यांनाही धमकावत ढकलाढकली सुरू केली.

वाळू


“नीलेश शेंडगेसारखे संपवतो” म्हणत गोंधळात फरार नगरसेवक अर्जुन दाभाडे याने थेट बंदूक काढून फिर्यादीच्या अंगावर रोखली. “तुला नीलेश शेंडगेसारखे संपवतो,” अशी धमकी देत त्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या झाडल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सुदैवाने अंधारामुळे गोळ्यांचा नेम चुकला. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नीलेश शेंडगे हत्या प्रकरण आणि ‘मोक्का’सारख्या कठोर कायद्यांतर्गत पोलिसांना हवा असलेला आरोपी दुसऱ्या जिल्ह्यात खुलेआम फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाळू

एका बाजूला पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असल्याचा दावा करतात, तर दुसऱ्या बाजूला तोच आरोपी नदीपात्रात अवैध वाळू तस्करी करताना, शस्त्र घेऊन फिरताना आणि थेट गोळीबार करताना दिसत आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटला राजकीय किंवा स्थानिक पातळीवर संरक्षण मिळत आहे का? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यापूर्वीही त्यांच्या शेताशेजारील नदीपात्रातून वाळू चोरी करत होते. त्यामुळे सर्व आरोपी ओळखीचे असल्याचेही म्हटले आहे.
या प्रकरणी वीरगाव पोलिसांनी अर्जुन खुशाल दाभाडे, उद्देश अशोक मंडलिक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी बबन ढमके, राहुल चव्हाण, विजय उर्फ भोगर भास्कर हटांगळे, मंगेश साहेबराव साळवे, विजय पवार, राहुल थोरात (सर्व रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) या आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

वाळू

गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू तस्करी, फरार आरोपींची दहशत, मोक्कातील आरोपींकडून थेट गोळीबार आणि शेतकऱ्यांच्या जीवाला निर्माण झालेला धोका या सर्व घटनांमुळे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.राजकीय संरक्षण, पोलिस यंत्रणेवरील दबाव आणि संघटित गुन्हेगारी यांच्या संगनमतामुळे ग्रामीण भागात सामान्य नागरिक भयभीत झाले असून, आता या प्रकरणात पोलीस आणि प्रशासन नेमकी किती कठोर कारवाई करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाळू
वाळू
वाळू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाळू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!