HDFC Bank Scam : आता HDFC बँकेत अंतर्गत पातळीवर प्रचंड मोठी खळबळ उडवून देणारा एक घोटाळा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बँकेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने उद्योग-बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती
HDFC Bank Scam : देशातील आघाडीची खाजगी बँक असलेली एचडीएफसी बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी बँकेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने उद्योग-बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता HDFC बँकेत अंतर्गत पातळीवर प्रचंड मोठी खळबळ उडवून देणारा एक घोटाळा समोर आला आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेवी स्वीकारण्याच्या बदल्यात व्याज म्हणून देण्यात येणाऱ्या परताव्यात हा घोटाळा झाल्याचे म्हटले जात आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’या वृत्तपत्राने बँकेच्या दक्षता अहवाल आणि इतर कागदपत्रांच्या आधारे या घोटाळ्याबाबत वृत्त दिले आहे. बँकेने महाराष्ट्र सरकारच्या ‘एमएसआरडीसी’ (MSRDC) या बड्या एजन्सीला कोट्यवधी रुपयांचा गुप्त परतावा (व्याज) देण्यासाठी चक्क बोगस मार्केटिंग खर्चाचा आसरा घेतला आणि रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांचे उघड उल्लंघन केले असल्याचा ठपका ठेवला आहे.

या प्रकरणाची पाळेमुळे मार्च २०२६ मध्ये घडलेल्या एका मोठ्या घडामोडीशी जोडलेली आहेत. HDFC बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अतुल चक्रवर्ती यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आपल्या मूल्यांशी तडजोड होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी बँक आणि आरबीआयने ‘सगळं काही आलबेल’ असल्याचा दावा केला होता. परंतु, एक्सप्रेसच्या पडताळणीनुसार, १२ मार्च रोजी बँकेची ऑडिट कमिटी एका गोपनीय अंतर्गत दक्षता तपासात (Internal Vigilance Investigation) व्यस्त होती.
हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) दिलेल्या ४५ कोटी रुपयांच्या संशयास्पद पेमेंटशी संबंधित आहे. २०२१ मध्ये HDFC बँकेने MSRDC ला त्यांचे २५,०००० कोटी रुपये बँकेत जमा करण्यास सांगितले. त्यावेळी बँक इतर ग्राहकांना ३.५ टक्के व्याज देत होती, तर इतर वित्तीय संस्था MSRDC ला ६ टक्के किंवा त्याहून अधिक व्याज देत होत्या. अखेर, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी संमतीने MSRDC ला ६.०१ टक्के इतका मोठा परतावा देण्याची एक ‘गुप्त मौखिक डील’ ठरली.

आरबीआयच्या नियमांनुसार बँक कोणत्याही एका ग्राहकाला असा लपवून अतिरिक्त व्याज देऊ शकत नाही. बँकेने अधिकृतपणे ४.२५ टक्केचा एक स्पेशल दर काढला, पण नंतर तोही बंद करावा लागला. यामुळे मूळ ६.०१ टक्के व्याजात आणि बँकेच्या अधिकृत दरात २.५१ टक्केचा फरक (Differential Interest) उरला.
हा अतिरिक्त व्याजाचा फरक लपवण्यासाठी HDFC बँकेने एक अजब शक्कल लढवली. हा खर्च बँकेच्या रेकॉर्डमध्ये ‘व्याज’ म्हणून न दाखवता, ‘मार्केटिंग खर्च’ आणि रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचे प्रायोजकत्वाचा खर्च म्हणून दाखवण्यात आला. ४ स्थानिक व्हेंडर्सच्या माध्यमातून बोगस इनव्हॉइसेस (बिलं) तयार करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, ९ कोटी रुपयांच्या तीन वेगवेगळ्या बिलांवर चक्क एकच फोटो वापरण्यात आला होता. ऑडिट रिपोर्टमध्ये रस्ता सुरक्षेचा कोणताही कॅम्पेन प्रत्यक्षात झाल्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नाही. तरीही, आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये या अंतर्गत तब्बल ३९.७ कोटी रुपये चुकते करण्यात आले.आरबीआयच्या नियमांनुसार बँक कोणत्याही एका ग्राहकाला असा लपवून अतिरिक्त व्याज देऊ शकत नाही. बँकेने अधिकृतपणे ४.२५ टक्केचा एक स्पेशल दर काढला, पण नंतर तोही बंद करावा लागला. यामुळे मूळ ६.०१ टक्के व्याजात आणि बँकेच्या अधिकृत दरात २.५१ टक्केचा फरक (Differential Interest) उरला.

हा अतिरिक्त व्याजाचा फरक लपवण्यासाठी HDFC बँकेने एक अजब शक्कल लढवली. हा खर्च बँकेच्या रेकॉर्डमध्ये ‘व्याज’ म्हणून न दाखवता, ‘मार्केटिंग खर्च’ आणि रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचे प्रायोजकत्वाचा खर्च म्हणून दाखवण्यात आला. ४ स्थानिक व्हेंडर्सच्या माध्यमातून बोगस इनव्हॉइसेस (बिलं) तयार करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, ९ कोटी रुपयांच्या तीन वेगवेगळ्या बिलांवर चक्क एकच फोटो वापरण्यात आला होता. ऑडिट रिपोर्टमध्ये रस्ता सुरक्षेचा कोणताही कॅम्पेन प्रत्यक्षात झाल्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नाही. तरीही, आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये या अंतर्गत तब्बल ३९.७ कोटी रुपये चुकते करण्यात आले.

बँकेचे चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO) रवी संथानम यांनी चौकशीत कबूल केले की, मार्केटिंग विभागाने हे संपूर्ण स्ट्रक्चर उभे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बिझनेस टीमने डील तयार केली होती, फायनान्स टीमने अतिरिक्त बजेट दिले आणि मार्केटिंग टीमने ते पेमेंट प्रोसेस केले, जेणेकरून अतिरिक्त व्याजाची रक्कम लपवता येईल.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







