आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शंकरराव गडाख

नेवासा तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारे नेतृत्व म्हणजे माजी मंत्री शंकरराव गडाख साहेब. सत्ता असो वा नसो, पद असो वा नसो; सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत जनसेवेचे व्रत अखंडपणे जपणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते.
वयाच्या विशीतच गावागावात फिरत तरुण, शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी त्यांनी सुरू केलेला प्रवास आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. कार्यालयात बसून नव्हे, तर चहाच्या टपरीवर, शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला किंवा गाडीत बसूनही जनतेची कामे सहजतेने मार्गी लावण्याची त्यांची कार्यशैली सर्वसामान्यांना आपलेपणाची भावना देते.

शंकरराव गडाख


राजकारणात शब्दांचे खेळ करण्यापेक्षा स्पष्ट भूमिका घेणे, खोटी आश्वासने न देता तात्काळ निर्णय घेणे आणि दिलेल्या शब्दाला प्रामाणिक राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. वेळ आणि वचन पाळणारे नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर आहे.
शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी जिल्हा बँकेमार्फत अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अनेकांसाठी दिलासादायक ठरला.
घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू करून शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये व्यापारी दृष्टिकोन निर्माण केला. यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली, तर परिसरातील अर्थकारणालाही चालना मिळाली. हॉटेल व्यवसाय, कृषी सेवा केंद्रे, वाहतूक, बारदाना दुकाने अशा विविध क्षेत्रांत रोजगार निर्माण झाले आणि शेकडो तरुण उद्योजक बनले.
नेवासा आणि कुकाना येथे बाजार समितीमार्फत उभारण्यात आलेले भव्य व अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स ग्रामीण भागातील व्यापारी संस्कृतीला नवे बळ देणारे ठरले. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे विस्थापित झालेल्या अनेक युवकांना या कॉम्प्लेक्समध्ये गाळे उपलब्ध करून देत त्यांच्या संसाराला नवी दिशा देण्यात आली.

शंकरराव गडाख


नेवासा बाजार समितीत खुला कांदा लिलाव सुरू करून कांदा उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. मुळा सहकारी साखर कारखान्याची क्षमता वाढ, इथेनॉल व वीज प्रकल्प उभारणी अशा निर्णयांतून सभासदांचे हित जपले गेले.
शेती, पाटपाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीवर त्यांचा कायम भर राहिला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व बाजूंनी विरोधकांचा सामना करत त्यांनी अपक्ष म्हणून विक्रमी मतांनी विजय मिळवला आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री म्हणून कार्य करत नेवासा तालुक्याच्या विकासाला मोठी गती दिली.
त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पूल, कालवा दुरुस्ती, लिफ्ट इरिगेशन, बंधारे खोलीकरण, शाळा खोल्या, ग्रामीण रुग्णालये, पशुवैद्यकीय दवाखाने, पाणी योजना, वीज सबस्टेशन आणि प्रशासकीय इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना सुरू करून राज्यातील जलसाठा वाढविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
घोगरगाव आणि धनगरवाडी येथील वीज सबस्टेशनच्या कामांमुळे विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला. विविध पाणी योजनांमुळे गावागावांत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आणि माता-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरू लागला.

शंकरराव गडाख


धर्मकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत तालुक्यातील मठ, मंदिरे, देवस्थाने यांच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. सभामंडप, सुशोभीकरण, संरक्षक भिंती, मंदिर पुनरुज्जीवन आणि सप्ताहांना मदत अशा कामांतून त्यांनी कोणताही गाजावाजा न करता धर्मकार्य जोपासले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत व्यक्तिगत टीका आणि विषारी प्रचाराला सामोरे जावे लागले. निसटता पराभव झाला, तरी जनतेशी असलेली बांधिलकी कायम ठेवत आजही ते जनसेवेत सक्रिय आहेत.
पहाटे चार वाजल्यापासून सुरू होणारा त्यांचा दिनक्रम आणि सकाळी सातपासून जनतेसाठी सुरू होणारी धावपळ ही त्यांच्या कार्यतत्परतेची साक्ष आहे. भेटण्यासाठी आलेला प्रत्येक माणूस समाधानाने घरी जावा, ही त्यांची भावना असते. “अतिथी देवो भव” या उक्तीप्रमाणे आलेल्या व्यक्तीला चहा-पाणी व अल्पोपहाराशिवाय न पाठवण्याची त्यांची परंपरा आजही कायम आहे.
स्वतःचा वाढदिवस डामडौलात न साजरा करता सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्यावर त्यांचा भर असतो.

शंकरराव गडाख

म्हणूनच नेवासाच्या जनतेच्या मनातून एकच भावना उमटते —
“दूरदृष्टीचे दीप तुम्ही, सेवेचे संकल्प तुम्ही…
कर्तृत्वाचा साक्षात धर्म तुम्ही,
नेतृत्वाचा तेजोमय वारसा तुम्ही…
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आधार तुम्ही…”
नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे व्रत हाती घेऊन कार्यरत असलेल्या जनसामान्यांच्या या लोकनेत्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
शब्दांकन
राहुल राजळे..
9527110809

शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!