आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सोनई
सोनई

घोडेगाव–छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, सोनई येथे काल रात्री सुमारे १२ वाजेच्या दरम्यान एक महिला एकटीच संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याची माहिती सोनई पोलीस स्टेशनला मिळाली. संबंधित महिला कोणतीही माहिती सांगत नसल्याने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी तत्काळ सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकीत्ते यांना घटनास्थळी पाठविले.पोलीस अंमलदार देवीदास आव्हाड, महिला पोलीस अंमलदार कमल आघाव यांच्या मदतीने संबंधित महिलेला सुरक्षितरित्या सोनई पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.

सोनई

पोलिसांनी अत्यंत संयमाने व आपुलकीने तिची चौकशी केली. तपासादरम्यान तिच्या राहुरी येथील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात पोलिसांना यश आले. आज सकाळी सुमारे १० वाजता संबंधित महिलेला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. सोनई पोलिसांच्या तत्परतेमुळे व संवेदनशील कामगिरीमुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलिसांची समाजाभिमुख व मदतीस तत्पर अशी सकारात्मक प्रतिमा पुन्हा अधोरेखित झाली आहे.

सोनई
सोनई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सोनई
सोनई
सोनई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सोनई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!