आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पोलीस

घोडेगाव– सोनई पोलीसांचे परिसरातील सुरू असलेल्या व्यावसायिकांवर छापेमारीचे सत्र सुरू या बाबत सविस्तर माहिती अशी की पानेगाव येथे कैलास शिवाजी गायकवाड हा आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे तयार गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. १००० रुपये किंमतीची १० लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. शिवाजी दशरथ आढाव (वय.४०) रा. चांदा हा देखील राहते घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करत होता. १००० रुपये किंमतीची १० लिटर तयार दारू जप्त करण्यात आली.

पोलीस

सुमंत रावसाहेब थोरात (वय.३४) रा. चांदा हा आपल्या राहत्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करताना मिळुन आला. १००० रुपये किंमतीची १० लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. घोडेगाव ते पांढरी पुल रोडवरील शिंगवे तुकाई शिवारात असणाऱ्या हाॅटेल शिवप्रेमी या ठिकाणी भागचंद सुभाष पवार (वय.४२)याचे कडून २५०० किंमतीची २५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.

पोलीस

पानेगाव मांजरी रोडवरील सागर शामराव वाघमारे (वय.३५) हा एका टपरी मध्ये विना परवाना देशी दारूची विक्री करताना मिळुन आला. ९६० रुपये किंमतीच्या १२ बाटल्या या ठिकाणाहून जप्त करण्यात आल्या. पानेगाव येथे वसंत दामु जंगले हा कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना व खेळविताना आढळून आला. १५८० रुपये रोख व खेळण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दाखल फिर्यादी वरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!