आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पोलीस
पोलीस

घोडेगाव —नेवासा तालुक्यातील घोडेगाव सह पोलीस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या मध्ये पानसवाडी येथे एका टपरी मध्ये सागर गणपत जाधव (वय.४३) हा विना परवाना बेकायदा गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करताना मिळुन आला. २००० रुपये किंमतीची २० लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. पोलीस काॅस्टेबल योगेश बोरुडे यांच्या फिर्यादी वरून महा. दारू बंदी कायदा कलम ६५(ई) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पवार हे करत आहेत.

पोलीस

घोडेगाव येथील हाॅटेल पंचरत्न शेजारी एका टपरी विना परवाना बेकायदा बंटी राॅय हा देशी विदेशी दारू विक्री करताना मिळुन आला. २५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दाखल फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकीत्ते हे करत आहेत. हाॅटेल पंचरत्न समोर एका टपरी मध्ये बाळासाहेब गायकवाड हा विना परवाना देशी दारू विक्री करताना मिळुन आला. १२८० रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणाहून जप्त करण्यात आला.

पोलीस

पांढरी पुल येथे हाॅटेल जय मल्हार मध्ये देखील विना परवाना दारू विक्री करत असताना प्रमोद रावसाहेब घुले (वय.३२) रा. लोहगाव मिळुन आला. १६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दाखल फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत. पोलीसांच्या या कारवाई मुळे परिसरातील अवैध धंद्यांवाल्याचे धाबे दणाणले आहे.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!