
नेवासा – नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा)-बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदांचे आरक्षण दि. ११ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आले असून, यानंतर गावातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

ग्रामपंचायतीसाठी एकूण ९ सदस्यपदे निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी ३ वार्डांची रचना करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार सदस्यपदांचे वाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

वार्डनिहाय आरक्षण
वार्ड क्र. १
- १ जागा – अनुसूचित जमाती (एसटी)
- २ जागा – सर्वसाधारण महिला
वार्ड क्र. २
- १ जागा – नामाप्र (ना.मा.) महिला
- १ जागा – सर्वसाधारण महिला
- १ जागा – सर्वसाधारण

वार्ड क्र. ३
- १ जागा – नामाप्र (ना.मा.)
- १ जागा – सर्वसाधारण महिला
- १ जागा – सर्वसाधारण
आरक्षण धोरणानुसार एकूण ९ सदस्यपदांपैकी ५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणाबाबत नागरिकांना दि. १९ जून २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.
ही आरक्षण सोडत ग्रामसभेत पार पडली. यावेळी ग्रामसेवक श्री. मुसमाडे, ग्राममहसूल अधिकारी श्री. जरे, मंडलाधिकारी श्री. पवार, प्रशासक तथा सरपंच महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गणेश शिंदे, अभिजीत शिंदे, किशोर शिंदे, सौरभ शिंदे, रामभाऊ शिंदे (माजी चेअरमन), पत्रकार प्रल्हाद शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, आगामी काळात गावातील राजकीय वातावरण आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







