
नेवासा –शहरात नुकत्याच काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला नवीन आलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री प्रताप जी दराडे साहेब यांचा ज्ञान फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊली यांची प्रतिमा व शाल देण्यात आली. नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत आपल्या हातून चांगले काम होवो, तसेच आपले काम करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही असे काम दराडे साहेब यांनी करावे अशी भावना यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक दराडे साहेब म्हणाले की माझे भाग्य आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण जगाला ज्ञान दिले त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी या पावनभूमीत मिळाली. यावेळी फाउंडेशनचे आदित्य खंडाळे,अक्षय मारकळी
संदीप वीर,सोमनाथ गाढेकर,आकाश जायगुडे,
,निलेश खंडाळे,अजित मारकळी
पप्पू डौले,विजय गायकवाड,अनिल अरगडे,सचिन तनपुरे,प्रा.देविदास साळुंके,समीर घुले,हरिभाऊ शेजुळ,प्रदीप पाठे आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







