आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शंकरराव गडाख

केवळ तीन जागांसाठी मतदानाची वेळ; विरोधकांना पूर्ण पॅनल उभे करण्यात अपयश.

सोनई – मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. गुरुवार (दि. १८) रोजी उमेदवारी अर्ज माघारीनंतर गडाख गटाच्या १८ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, आता केवळ करजगाव गटातील दोन जागा आणि महिला प्रतिनिधीची एक जागा यासाठीच निवडणूक होणार आहे.

शंकरराव गडाख

निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर गडाख विरोधी गटाकडून सर्व जागांवर लढत दिली जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात विरोधकांना सर्व जागांसाठी उमेदवार उभे करता आले नाहीत. परिणामी २१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड झाल्याने विरोधी पॅनलवर केवळ तीन जागांसाठी निवडणूक लढविण्याची नामुष्की ओढवली आहे.

शंकरराव गडाख

बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये सोनई गटातून वसंत चिमा कुसळकर, छाया भास्कर भुसारी व दिनकर अंबादास घावटे यांचा समावेश आहे. घोडेगाव गटातून लक्ष्मण तुळशीराम पांढरे, एकनाथ मारुती जगताप व दत्तात्रय भानुदास बऱ्हाटे, तर खरवंडी गटातून बापूसाहेब शंकर शेटे, भाऊसाहेब निवृत्ती मोटे व सोपान विठ्ठल विरकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

शंकरराव गडाख

नेवासा गटातून बाळासाहेब पुंजाजी भणगे व त्रिंबक काशिनाथ सुकाळकर, तर प्रवरासंगम गटातून बाळासाहेब दादा पाटील व पांडुरंग श्रीरंग निपुंगे यांची निवड झाली आहे. सहकारी संस्था मतदारसंघातून शंकरराव यशवंतराव गडाख, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून शंकर पंढरीनाथ कदम, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून भाऊसाहेब हरिभाऊ भालके आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून बाळासाहेब भाऊलाल परदेशी हे बिनविरोध संचालक झाले आहेत.

शंकरराव गडाख

दरम्यान, करजगाव गटात गडाख गटाचे ज्ञानेश्वर रामराव दरंदले व चंद्रकांत भानुदास टेमक यांच्याविरोधात किरण जाधव, नारायण डौले तसेच अपक्ष उमेदवार गोरक्षनाथ जाधव रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधी मतदारसंघात गडाख गटाच्या कमल चांगदेव दहिफळे व विमल नारायण सोनवणे यांच्याविरोधात मीरा दिवटे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.

शंकरराव गडाख

१८ जागांवर बिनविरोध निवड झाल्यामुळे नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांची मजबूत पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!