माका | आदिनाथ म्हस्के – नेवासा तालुक्यातील माका येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये आज रविवार दिनांक 28/6/2026 पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली..
प्राथमिक आरोग्य केंद्र चांदा उपकेंद्र माका अंतर्गत माका व पाचुंदा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम 2026 राबविण्यात आली,
दिवसभरामध्ये 225 बालकांना पोलिओ डोसचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी गावातील सरपंच तसेच प्रतिष्ठित व्यक्ती या प्रसंगी उपस्थित होते तसेच लसीकरण प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे सर तसेच प्रा.आ.केंद्र चांदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांगुणे सर व आरोग्य सहाय्यक श्री रायभोग सर यांनी लसीकरण पाहणी केली व उपस्थित महिलांना पोलिओ लसीकरणाची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली
यावेळी उपकेंद्र माकाचे सर्व कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक तसेच सर्व आशा व अर्धवेळ महिला सहाय्यक उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







