आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
स्वप्निल मापारी
स्वप्निल मापारी

नेवासा : नेवासा शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून शहरातील विविध भागांमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक प्रभागांमध्ये गेल्या सात ते दहा दिवसांपासून कचरा संकलन करणाऱ्या गाड्या न आल्याने कचऱ्यामध्ये अळ्या पडल्या असून दुर्गंधी पसरली आहे. परिणामी डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वप्निल मापारी

सध्याच्या परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया तसेच इतर साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवून फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी तसेच बी.सी. पावडरची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वप्निल मापारी

दरम्यान, नेवासा शहरातून लवकरच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान होणार असून या सोहळ्यासाठी हजारो वारकरी शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच आषाढी एकादशी व कामिका एकादशी निमित्तही मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

स्वप्निल मापारी

या सर्व बाबींचा विचार करून नेवासा शहरात तातडीने फॉगिंग मशीनद्वारे फवारणी, बी.सी. पावडरची फवारणी तसेच नियमित कचरा संकलनाची व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सागर झावरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

स्वप्निल मापारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्वप्निल मापारी
स्वप्निल मापारी
स्वप्निल मापारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्वप्निल मापारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!