मुळा धरणाच्या पाणीप्रश्नी 2023 मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी दाखल फौजदारी गुन्ह्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांना नेवासा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे
बुध दि 8 जुलै 2026 रोजी
मा मंत्री गडाख यांनी कोर्टात हजेरी
लावली.

प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जुलै 2026 रोजी होणार असून त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मुळा धरणाच्या पाणीप्रश्नी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शंकरराव गडाख यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी घोडेगाव चौफुला येथे जनआंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान त्यांच्यासह प्रमुख आंदोलकांविरोधाका कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात गडाख यांनी नेवासा येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयात हजेरी लावली. न्यायाधीश श्रीमती सुळ यांच्या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत त्यांना दिलासा मिळाला असला, तरी खटल्याच्या कामकाजासाठी प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
दरम्यान, 2023 मधील हे आंदोलन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गाजले होते. शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी गडाख यांनी समर्थक व शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडल्याने तालुका व जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणी आता प्रत्यक्ष सुरू झाली असून 16 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे तालुक्यातील शेतकरी, समर्थक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







