नेवासा – विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम अंतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे कामकाज 100 टक्के पूर्ण झाले असून त्यात शेवगाव मतदारसंघाचे देखील कामकाज पूर्ण झाले असून मतदान केंद्र निहाय मयत ,दुबार तसेच कायम स्वरुपी स्थलांतरित मतदारांच्या याद्या तातडीने BLA यांना उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री सुनील गाढे यांनी शेवगाव मतदार संघाचा आढावा घेताना दिल्या आहेत. शेवगाव तहसील कार्यालयात 20 टक्क्यांपेक्षा अधिक असंकलित मतदार संख्या असणाऱ्या BLO यांचे कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांचे निर्देशानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी घेतला आहे.

यावेळी उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मयत दुबार व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या याद्या BLA यांना देण्याबाबत व त्यांचे सोबत यासंदर्भात बैठक घेऊन त्याचे इतिवृत्त अपलोड करण्याच्या सूचना दिल्या. 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी भेटीची मुदत असल्याने मयत दुबार स्थलांतरित यादीत चुकून नाव आले असल्यास त्याची माहिती संबंधित मतदार यांनी 16 ऑगस्ट पर्यंत स्थानिक BLO किंवा तहसील कार्यालयास दिल्यास त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करता येणार आहे. जिल्हा स्तरावर देखील या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून मतदारांनी या यादीचे अवलोकन करण्याच्या देखील सूचना त्यांनी दिल्या आहेत.

क्षेत्रीय स्तरावर सामानगाव ता.शेवगाव येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री सुनील गाढे यांनी भेट देऊन BLO यांचे कामाची पाहणी केली.तसेच यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नागरिकांशी देखील याबाबत त्यांनी संवाद साधला.
बैठकीच्या वेळी तहसीलदार आकाश दहाडदे ,निवडणूक नायब तहसील विशाल सदनापूरकर, अभिजित राय कवाड ,सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ,मतदानकेंद्र स्तरीय अधिकारी इत्यादी हजर होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







