नेवासा- आज सृजन कट्टा येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तक परिचय स्पर्धा’ अत्यंत उत्साहात
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अरुण धनवट सर यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून बाल मित्रांना मार्गदर्शन केले..
आज ज्ञानोदय , बदामबाई गांधी , सुंदरबाई गांधी , सेवेन्थ डे आणि त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे 25 विद्यार्थी सहभागी झाले होते.
आजच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. किशोर धनवटे , डॉ. निर्मलाताई सांगळे , राजेंद्र चौधरी आणि निलेश जोशी यांनी काम पाहिले . सूत्रसंचालन प्रा. देविदास साळुंके यांनी केले.

आजकालची मुले मोबाईलमध्ये व्यस्त असतात आणि वाचनापासून दूर गेली आहेत, या समजाला आजच्या स्पर्धकांनी आपल्या अफाट वाचनाच्या जोरावर सपशेल खोटे ठरवले छोट्या दोस्तांनी विविध पुस्तकांचे केलेले सखोल विश्लेषण, त्यांची मांडणी आणि वाचनाप्रती असलेली त्यांची ओढ पाहून अचंबित व्हायला झाले.
इतिहास, विज्ञान, कथा-कादंबऱ्या ते थेट माऊलींच्या ज्ञानेश्वरी पर्यंत अनेक विषयांना मुलांनी आपल्या रसाळ भाषेत कट्ट्यावर जिवंत केले.

पुस्तकांचे हे वेड आणि साहित्याबद्दलची ही आस्था पाहून खात्री पटली की, आपल्या भावी पिढीचे वैचारिक भविष्य अत्यंत सुरक्षित हातांमध्ये आहे! स्पर्धेत सहभागी सर्व बालवाचकांचे आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
आजच्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सृजन कट्ट्याच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार…
पुस्तक परिचय स्पर्धेचा पुढील भाग
रविवार 23 ऑगस्ट रोजी होणार आहे .
जरूर या..तरुणांचं वाचन आणि विवेचन पहायला , ऐकायला असे आवाहन संयोजक महेश मापारी यांनी केले आहे .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







