नेवासा | प्रल्हाद शिंदे : नेवासा तालुक्यातील जैनपुर येथे मंगळवार(दि. १८) पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, वेदांतचार्य ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के (ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा)यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वामी विश्वनाथगिरी महाराज यांच्या प्रेरणेने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात पहाटे ५ ते ६ काकडा भजन,सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण दुपारी ४ वा. ‘रुक्मिणी स्वयंवर कथा’ ह.भ.प. रायभान महाराज डिके यांच्या वाणीतून,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,रात्री ७ ते ९ कीर्तन व त्यानंतर नाम जागर असा दैनंदिन कार्यक्रम आहे.
या सप्ताहात लक्ष्मण महाराज नांगरे, गणेश महाराज तनपुरे, प्रकाश महाराज आव्हाड, स्वामी विश्वनाथगिरी महाराज, कृष्णानंद महाराज, रायभान महाराज डिके आणि गहिनीनाथ महाराज आढाव यांची कीर्तन सेवा होईल.
मंगळवार, (दि. २५) रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वेदांतचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटी कडून करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







