आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बुलडाणा अर्बन

नेवासा | बाळासाहेब पिसाळ : बुलडाणा अर्बन सहकारी संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील नेवासा शाखेच्या वतीने मयत कर्जदार सभासदाच्या वारसाला अपघाती विम्याचा लाभ देण्यात आला. स्व. विलास बाबुराव धोत्रे यांच्या कर्ज खात्याचा व्याजासह २ लाख ६६ हजार ४१२ रुपयांचा विमा क्लेम मंजूर करण्यात आला.

मौजे उस्थळ दुमाला येथील रहिवासी आणि बुलडाणा अर्बनचे सभासद विलास बाबुराव धोत्रे यांनी २५ एप्रिल २०२५ रोजी नेवासा शाखेतून २ लाख ३५ हजार रुपयांचे सोनेतारण कर्ज घेतले होते. मात्र, २४ मार्च २०२६ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

बुलडाणा अर्बन

संस्थेच्या नियमानुसार ठेवीदारांना ठेवीच्या रकमेइतके, तर कर्जदारांना कर्जाच्या रकमेइतके अपघाती विमा संरक्षण दिले जाते. धोत्रे यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर शाखा व्यवस्थापक ईश्वर मुरलीधर काकडे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच विमा योजनेची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आला.

यानंतर ICICI Lombard कंपनीने स्व. विलास धोत्रे यांच्या कर्जाच्या व्याजासह एकूण २,६६,४१२ रुपयांचा क्लेम मंजूर केला. २१ ऑगस्ट २०२६ रोजी मयत सभासदाच्या वारसदार सौ. ज्योती विलास धोत्रे यांना सोनेतारण कर्ज खात्यातील सोने आणि संबंधित रक्कम सुपूर्द करण्यात आली.

बुलडाणा अर्बन

हा लाभ उस्थळ दुमाला येथील सरपंच राजेंद्र उंदरे, सामाजिक कार्यकर्ते व सभासद किशोर भाऊ भणगे, नेवासा येथील व्यापारी अजित शेठ ठोळे, पत्रकार बाळासाहेब पिसाळ आणि सोनू पिटेकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक ईश्वर काकडे यांच्यासह शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बुलडाणा अर्बन संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या आर्थिक हितासोबतच सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

बुलडाणा अर्बन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बुलडाणा अर्बन
बुलडाणा अर्बन
बुलडाणा अर्बन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बुलडाणा अर्बन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!