आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिष्यवृत्ती

नेवासा – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) मध्ये नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या परीक्षेत कु. मनस्वी महेश कदम हिने ३०० पैकी २४२ गुण मिळवत ८०.६६ टक्के गुणांसह परीक्षा पात्र केली. तसेच कु. नुजत एजाजखान पठाण हिने ३०० पैकी २२८ गुण मिळवत *७६ टक्के, तर *कु. रोशनी दीपक धोत्रे हिने ३०० पैकी २१८ गुण मिळवत ७२.६६ टक्के गुण मिळवून परीक्षा पात्र केली. तिन्ही विद्यार्थिनी शिष्यवृत्ती मिळविण्यास पात्र ठरल्या आहेत.

शिष्यवृत्ती

विद्यार्थिनींच्या या यशामागे शाळेच्या *मुख्याध्यापिका श्रीमती सरस्वती लोंढे, वर्गशिक्षिका **श्रीमती कुलट मॅडम व श्रीमती बोरुडे मॅडम, तसेच *श्री. घोडके सर, श्रीमती पालकर मॅडम, श्रीमती वने मॅडम, श्री. मचे सर, श्री. कांगुणे सर आणि श्रीमती जगताप मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षाताई पठाडे, उपाध्यक्ष श्री. श्यामभाऊ डोकडे, समितीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच सर्व विद्यार्थी यांनी तिन्ही विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

या यशामुळे नेवासा खुर्दच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

शिष्यवृत्ती
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिष्यवृत्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!