आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गणेशोत्सव

नेवासा : शंभुराजे युवा प्रतिष्ठान व गुरुमाऊली मित्र मंडळ, खुपटी यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव तसेच गणेश विसर्जन मिरवणूक भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सोहळ्यास गावातील ग्रामस्थ, माता-माऊली, विद्यार्थी तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गणेश विसर्जन मिरवणुकीत रामकृष्णाश्रमातील महंत व विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, तसेच गावातील भजनी मंडळाचा सहभाग राहिला. यावेळी पारंपरिक पद्धतीने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

गणेशोत्सव

गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कलश सजावट स्पर्धेला विशेष प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पूर्वा शंकर चौधरी यांनी प्रथम, आराध्या भीमराज चौधरी यांनी द्वितीय तर भाग्यश्री संजय पोकळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी सरपंच श्री. गोरखचाचा तनपुरे, मार्गदर्शक श्री. बबलुदादा ससे व श्री. नारायण चौधरी यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

गणेशोत्सव

गावातील संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या गणेशोत्सवामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे व सहभागींचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

गणेशोत्सव
गणेशोत्सव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गणेशोत्सव
गणेशोत्सव
गणेशोत्सव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गणेशोत्सव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!