ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

तहसील

नेवासा – तहसील कार्यालय मध्ये आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी शेत व शिव रस्त्या प्रश्नासाठी व समस्या सोडवण्यासाठी जनन्याय दिन कार्यक्रम घेतला जात असून गुरुवार दिनांक पाच डिसेंबर 2024 रोजी शेत शिव पानंद रस्ता जनन्याय दिन कार्यक्रमात नायब तहसीलदार श्री चांगदेव बोरुडे व श्री कुलकर्णी श्री उमाप या अधिकाऱ्यांनी शिव – पाणंद शेत रस्ते चळवळीच्या कार्यकर्त्या बरोबर उपस्थित रस्ता ग्रस्त शेतकऱ्याच्या समस्यावर सविस्तर चर्चा करून शेत रस्ता समस्या निवारणासाठी पुढील कार्यवाही करीत असल्याचा मनोदय व्यक्त केला

त्यामुळे शेत रस्ता व शिव पानंद रस्ता चळवळीच्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीच्या माध्यमातून चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे व समन्वय श्री दादासाहेब जंगले यांचे मार्गदर्शनाने नेवासा तहसील येथे गुरुवार हा जनन्यायदिन पाळण्याचे तहसीलदार श्री संजय बिरादार यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केले होते त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा नंतर आलेल्या गुरुवारी जनन्याय दिन घेण्यात येईल असे तहसीलदार यांनी सुचविले होते त्यानुसार शेत रस्ते शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात दर गुरुवारी न्याय दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे .या जन न्याय दिनास ५ डिसेंबर20 24 रोजी तहसिल कार्यालयातील श्री चांगदेव बोरुडे नायब तहसीलदार व अव्वल कारकून श्री कुलकर्णी व उमाप लिपिक यांनी शेत रस्ता प्रकरणे हाताळली .

त्यामुळे तालुक्यातील उपस्थित असणाऱ्या ५० -६० समस्याग्रस्त शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले .यावेळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यां तहसिलदारांचे आदेश होऊनही दोन-तीन वर्षा नंतरही अजून रस्ते बंदच आहेत. रस्ते अडविणारे दाद देत नाहीत. दादागिरी व आडमुठेपणा करुन त्रास देतात. शेती पडीत ठेवावी लागत आहे.आमचे उत्पन्न बंद झाल्याने व मानसिक , शारीरिक , आर्थिक त्रास होत असल्याने आता आम्हाला जलद गतीने न्याय न्याय द्यावा अशी ही मागणी केली भूमि अभिलेखचे कार्यालय अधीक्षक यांना संपर्क करुन श्री संदीप गोसावी उपअधीक्षक भुमिअभिलेख यांनी कार्यालयातील श्री रगडे यांना न्याय दिनास उपस्थित केले. .

तहसील

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे यांनी शेत रस्ता व शिव रस्ता समस्या सोडविण्यासाठी चा जनन्याय दिनाचा बोर्ड- फलक तहसील कार्यालयात लावण्यात यावा प्रत्येक गुरुवारी मागील कामाची प्रकरणाची कार्यवाही केल्याचा आढावा घेण्यात यावा तसेच शेत रस्ता ग्राम समिती प्रत्येक गावामध्ये स्थापन झालेली नाही त्या संदर्भात पुन्हा स्मरणपत्रे देऊन तलाठी व ग्रामसेवक यांनी शेत रस्ता स्थापन लवकर कराव्यात व त्याचा अहवाल घेण्यात यावा असे सुचविले व जलद गतीने शेत रस्ता समस्या सोडविण्यात यावे अशी मागणी केली.

तसेच यानंतर तालुका भूमि अभिलेख मध्ये सर्व शेतकरी गेले असता आचारसंहितेमुळे तालुक्यातील शिव रस्त्यांचे आदेश होऊनही मोजणीचे कामकाज झाले नाहीत अशा १६ शिवरस्त्यांचे पुढील तारखा निहाय व मोजणी अधिकारीनिहाय कार्यक्रम निश्चित करून आदेश पत्र श्री संदीप गोसावी उपाधीक्षक भूमी अभिलेख नेवासा यांनी चळवळीचे कार्यकर्त्यांना दिले
व उर्वरित पुढील 20 शिव रस्त्यांची यादीही देण्यात आली त्याही यादीचे पुढील आठवड्यापर्यंत तारीख न्यायव्य अधिक मोजणी अधिकारी निहाय कार्यक्रम आदेश काढण्यात येणार आहेत यावेळी तालुक्यातील शिव – पाणंद रस्ता चळवळीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे , सागर सोनटक्के ,

त्र्यंबक भदगले कृष्णा घोडेचोर प्रवीण पवार,राजू गरड, कारभारी गरड मुरलीधर लक्ष्मण जरे शेषराव कुटे काशिनाथ कुटे ,, रमेश भक्त , कुशिनाथ फुलसौंदर , बाळू थोरात , विठ्ठल करमड , मिनिनाथ घाडगे , कानिफनाथ कदम , काशिराम धाडगे , अनिल सरोदे , अंबादास सरोदे सगाजी आयनर, शंकर रिंधे बबन शिंदे, संतोष शिंदे,सोमनाथ शिंदे भीमराज जाधव,संभाजी पवार अशोक कुऱ्हे काशिनाथ कुऱ्हे सरला काळे आदिंसह सुमारे ४० हुन अधिक शेतकरी उपस्थित होते. आता येत्या गुरुवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तहसील
तहसील

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तहसील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!