नेवासा – नेवासा फाटा येथे मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश झगरे आणि मक्तापूर मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुळा पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री. रावसाहेब नागपुरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी किशोर साबळे, निवृत्ती हजारे, योगेश रासकर, दिगंबर कुठे, आणि इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये श्री. अशोक नामदेव गव्हाणे, आसाराम गव्हाणे, भानुदास शिरसाठ, नारायण गव्हाणे, शिवछावा संघटनेचे प्रमुख सचिन गायकवाड, योगेश गायकवाड, दीपक बर्डे, मयूर साळवे, जोएल साळवे, मनोज झगरे, राहुल जामदार, अविनाश जामदार, आजिनाथ नानासाहेब जामदार, साहेबराव निपुंगे, दीपक शिंदे, अक्षय मगर, राजेंद्र कोळेकर, दत्ताभाऊ कांगणे, अनिल लहारे, सरपंच मच्छिंद्र पांडागळे, मच्छिंद्र चाबुकस्वार, शेषराव बनसोडे, पोपटराव हजारे, सरपंच सचिन कोळेकर, आणि गोरक्षनाथ नवघरे यांचा समावेश होता.
श्री. गणेश झगरे यांनी सांगितले की, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे शेतीवर विपरीत परिणाम होत असून, शेतकऱ्यांचे जीवनमान कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, 24 डिसेंबर रोजी मक्तापूर ग्रामपंचायतीसमोर सकाळी 11 वाजता महिलांसह ग्रामस्थांचा हंडा मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे.
श्री. झगरे यांनी ग्रामस्थ आणि महिलांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी केवळ विजयाचा उत्सव साजरा केला, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच हा मोर्चा शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आयोजित केला जात आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.