गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील किड्स किंग्डम अकॅडमी ने निरा येथे पार पडलेल्या स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. इंडियाज टॅलेंट हंट कॉम्पिटिशन २०२४ इंडिया इव्हेंट प्लॅनर द्वारे मान्यता प्राप्त स्पर्धा दिनांक १५ रोजी समता माध्यमिक आश्रम शाळा पडेगाव निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडल्या त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभरातून २३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये किड्स किंग्डम अकॅडमी च्या प्रथम क्रमांकावर शिवण्या शरद तांबे , तर द्वितीय क्रमांकावर सानिका महादेव जाधव,
अवनी नवनाथ तांबे, यशदिप प्रशांत कडू , वरद जयदत्त तांबे , तृतीय क्रमांक विराज विनय बेदमुथा, दर्शन संभाजी घनवट, यश गणेश बाडगू , अर्णव अतुल पाडळकर ,हर्षवर्धन भगवान लांडे ,सर्वेश प्रविण बंग याप्रमाणे यश मिळवून नेत्रदीपक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कीर्ती सचिन बंग यांनी अभिनंदन केले . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महादेव जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.