नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन बुधवार दि.२४ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारिणी सदस्य शंतनू हापसे पाटील ,अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, माजी व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर काळे, ज्येष्ठ संचालक सुनिल दानवे, ज्येष्ठ कलाप्रेमी रतिलाल गांधी, प्राचार्य रावसाहेब चौधरी, प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षिका सुनिता दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने डॉ. करणसिंह घुले पाटील यांचा सत्कार करण्यात आला.ज्या शाळेत मी घडलो त्या ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये माझा पहिला नागरी सत्कार होत आहे, याबद्दल मी आनंदून गेलो आहे. हा सत्कार या पुढील कार्य करण्यासाठी निश्चित ऊर्जा देणारा आहे. नेवासा नगरपंचायतीच्या वतीने विद्यालयाला शक्य होईल ते सर्व सहकार्य करू, असे प्रतिपादन डॉ. करणसिंह घुले पाटील यांनी केले.
यावेळी शंतनूजी हापसे पाटील, आप्पासाहेब शिंदे, सुनिल दानवे, ज्ञानेश्वर काळे, रतिलाल गांधी आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोरजी जोजार यांनी ५००० रुपये तर सुनिल दानवे यांनी ११०० रुपयांची पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विविध चित्रपटांतील गीतांच्या तालावर नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्फूर्तिदायक पोवाडा तसेच ‘कथा ज्ञानेश्वरीची’ही नाटिका विशेष लक्षवेधक ठरली. यावेळी नृत्यदिग्दर्शक कपिल चिंतामणी यांचा सन्मान करण्यात आला.
स्नेहसंमेलनासाठी नेवासा शहर व परिसरातील गावांतील पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी यांनी केले.
संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाची वाटचाल सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुरू आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. विद्यालय थोड्याच दिवसात अमृत महोत्सवाचा कार्यक्रम घेणार आहे. तसेच माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करणार असून त्यासाठी जास्तीत-जास्त माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. असे आवाहन त्यांनी केले.
स्नेहसंमेलनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना गोड स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका सुनिता दिघे यांनी मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







