आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात कार्यरत असलेल्या माऊली गोशाळेस आज महत्त्वपूर्ण स्वरूपाची चाऱ्याची मदत करण्यात आली. माजी सरपंच गोरक्षनाथ तनपुरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गोशाळेस मक्याच्या चाऱ्याचे चार टनांचे भोत अर्पण करण्यात आले. तसेच श्री विजय दगडू कावरे यांच्या वतीने तीन टनांचे उसाच्या वाढ्याचे भोत गोशाळेस देण्यात आले.

माऊली गोशाळे

या चाऱ्याचे भोत खाली करण्यासाठी राहुल देशमुख यांच्या वतीने जेसीबी मशीनचे सहकार्य करण्यात आले. या सामाजिक व धार्मिक उपक्रमाबद्दल श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रशासन व गुरुवर्य देविदास बाबा म्हस्के यांच्या वतीने सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला.

माऊली गोशाळे

यावेळी मंदिराचे सर्व सेवेकरी उपस्थित होते. गोशाळेच्या दैनंदिन कार्यासाठी मिळालेली ही मदत मोलाची ठरणार असल्याचे मत मंदिर प्रशासनाने व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!