नेवासा फाटा प्रतिनिधी बाळासाहेब देवखिळे- मुकिंदपुरच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ.कल्पना सतीश निपुंगे यांचे संकल्पनेतून व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत महिलांच्या स्नेह मेळावा निमित्ताने, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हळदीकुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. यावेळी ९५० महिलांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावून लाभ घेतला.
यावेळी सौ निपुंगे बोलताना म्हणाल्या की मुकीदपुर परिसर शेतकरी,व्यवसायिक व नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्या विविध अडीअडचणी, शासनाकडिल योजना ग्रामपंचायत मार्फत असलेल्या विविध योजना यासाठी चर्चा मसलत निमित्ताने महिलांचा मेळावा आयोजित केला होता. यामध्य अडचणी वरती चर्चा होऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्राधान्याने सुरुवात करत आहोत. यावेळी अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचा समन्वय साधून प्रत्येक कुटुंबातील महिलांच्याअडचणीसाठी आम्ही बांधील आहोत त्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे असे सांगितले.

या कार्यक्रमासाठी सौ रत्नमाला लंघे यांनीही उपस्थित दर्शविली. त्यांनीही महिलांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनाचा फायदा घ्यावा त्यासाठी माझ्याकडे संपर्क करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी खुशीताई लखवाल, सुरेश नगरचे सरपंच शैलाताई उभेदळ,उपसरपंच कविता कानिफनाथ कराडे, ग्रामपंचायत सदस्या भारती कर्डक,डॉ. प्रियंका अविनाश काळे, नंदाताई पांडुरंग निपुंगे,ग्रामविकास अधिकारी यांच्या पत्नीअनिताताई संतोष खंडागळे, शीलाताई देवखिळे,मीनाताई निपुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी मुकुंदपुर ग्रामपंचायत सदश्या नंदाताई निपुंगे, मीनाताई निपुंगे, सुनिता निपुंगे,
खंडागळे, शीलाताई देवखिळे, मीनाताई निपुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी मुकुंदपुर ग्रामपंचायत सदश्या नंदाताई निपुंगे, मीनाताई निपुंगे, सुनिता निपुंगे, सुनीता उपळकर, मंजू खंडागळे, वर्षा केदारे, वर्षा डमाळे, पुष्पा शिरसाठ, कोमल घुले, डॉ अनिता हांडे, माया कांबळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंगणवाडी सेविका संगीता निपुंगे, वंदना सोनकांबळे, वर्षा देशमुख, मीरा चव्हाण, संगीता कांडके, मीना लोखंडे यांचे सह आशा सेविका नलिनी जपे, उमा गायकवाड, रेखा साळवे, निकिता मिसाळ, ज्योती शेंडे व महिला बचत गट प्रतिनिधी कावेरी उपळकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर सर्व महिलांना वाणाचे वाटप करण्यात आले तसेच अल्पोपहार ठेवण्यात आला होता.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

