गुन्हा
गुन्हे

नेवासा – नगरपंचायतीतील निवडणुकीनंतर सुरू असलेल्या राजकीय व प्रशासकीय संघर्षात, नगराध्यक्षांच्या तक्रारीनंतर सात दिवसांनी नगरपंचायत प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत उपनगराध्यक्षांसह दहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक सागर शांताराम झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उपनगराध्यक्षा शालिनी संजय सुखधान यांच्यासह संजय लक्ष्मण सुखधान, राजेंद्र कारभारी काळे, दिनेश व्यवहारे, सोनल राहुल चव्हाण, आसिफ पठाण, जयश्री चंद्रकांत शिंदे, जितेंद्र भाऊसाहेब कुन्हे, स्वप्नील उर्फ सागर राजेंद्र मापारी आणि संभाजी शिवाजी धोत्रे यांच्याविरोधात शासकीय कामकाजात अडथळा, अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि कार्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, २७ जानेवारी रोजी स्वच्छतेच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली. या वेळी उपनगराध्यक्षांचे पती संजय सुखधान यांच्यासह काही नगरसेवक व अन्य व्यक्तींनी अरेरावीची भाषा वापरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम थांबवण्यास भाग पाडले. कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले तसेच विनाअधिकार अग्निशमन दलाचा बंब बोलावण्याची सूचना देण्यात आल्याचा आरोप आहे. मुख्याधिकारी कार्यालयात आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी भयभीत अवस्थेत नगराध्यक्षांच्या दालनात बसलेले होते.

गुन्हे

याच वेळी उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान नगराध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या होत्या तसेच दालनावरील नगराध्यक्षांची अधिकृत पाटी काढण्यात आल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. २९ जानेवारी रोजीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. उपनगराध्यक्षांच्या पतीने अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत म्हटले आहे. या घटनांमुळे नगरपंचायतीचे नियमित कामकाज विस्कळीत झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हे
गुन्हे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!